जळगाव, 2 जून- एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा रविवारी अपघात झाला. या अपघातात आमदार सतीश पाटील यांच्यासह चार जण थोडक्यात बचावले. मिळालेली माहिती अशी की, आमदार सतीश पाटील हे मुंबईला कामानिमित्त गेले होते. ते आपल्या खासगी गाडीने जळगावहून पारोळा जात असताना रवांजे फाट्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीला अपघात झाला. रस्त्याच्या कडेला ट्रान्सफार्मर होता. गाडी खड्ड्यात जाऊन ट्रान्सफार्मरच्या तारांना धडकली. आमदार पाटील यांच्यासोबत गाडीत एस.एस. पाटील, भैय्या माने, शिवाजी पवार व चालक गुलाब पाटील होते. चाैघांना किरकोळ मुका मार वगळता सर्व जण सुखरूप आहेत. नशीब बलवत्तर असल्याने सतीश पाटील थोडक्यात बचावले. या अपघाताची माहिती मिळताच राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील हे आमदार पाटील यांच्या मदतीला धावून आले. गावकरीही मदतीला धावून आले. खड्ड्यात गेलेली गाडी गावकऱ्यांनी बाहेर काढली.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Komentáře