मुंबई -( वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात गदारोळ माजला आहे . भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊ शकतं असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते . मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे . एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार म्हणाले की , राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार नाही . आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय , काँग्रेस - राष्ट्रवादी थकलेत हे विधान कदाचित सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत : च्या वयावरुन केलं असावं असं अजित पवारांनी सांगितलं आहे . त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादीला विलीनीकरण हा मुद्दा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं . तसेच चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्यातील तरुण पिढी भाजपाच्या वाटेवर आहे असं सांगतात . माझ्याबद्दल तर ते बोलणार नाही , सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही बोलण्याची शक्यता नाही कारण ती तरुणी आहे . मग पुढची पिढी कोण हे घरी जाऊन विचारतो असं सांगत अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे . तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांना चंपा का बोलता असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला त्यावेळी सध्या सगळीकडे शॉर्ट शब्द वापरतात म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नावं चंपा असं बोलतो . दरम्यान , पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले की , अनेक नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी भाजपाने प्रलोभनं दिली , सर्वात जास्त त्रास पद्मसिंह पाटील कुटुंब सोडून गेल्याचा झाला . शरद पवारांच्या सुरुवातीपासून ते त्यांच्यासोबत होते . शेवटी राजकारण असतं पण तुमच्या गरजेला कुटुंब धावून येतं . त्यामुळे तो त्रास झाला असं त्यांनी सांगितले . विनोद तावडेंना तिकीट दिलं नाही त्याचं वाईट वाटलं . विरोधी पक्षनेते असताना ज्या आक्रमक पद्धतीने ते बोलायचे , गोपीनाथ मुंडे , प्रमोद महाजन असताना जे सोशल इंजिनिअरींग करण्यासाठी वेगवेगळे चेहरे आणले त्यात मराठा चेहरा म्हणून विनोद तावडेंना पुढे आणलं . लेवा पाटील म्हणून एकनाथ खडसेंना पुढे आणलं , धनगर म्हणून अण्णासाहेब डांगे यांना पुढे आणलं . त्यावेळी चंद्रकात पाटील हेदेखील नव्हते . त्यांचा पत्ता कट करण्यात आला ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे असं अजित पवारांनी सांगितले .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentarios