top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

आम्ही तुमच्या शाळेचे हेडमास्तर आहोत :- खा.संजय राऊत


दिल्ली : ' तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर आहोत ' तसेच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे , माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आमचे हेडमास्टर होते असा खोचक असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे . दरम्यान लोकसभा सभागृहानंतर राज्यसभा सभागृहात नागरिकत्व दुरुस्थी विधेयकावर ते बोलत होते . राज्यसभेत यावर जोरदार खडाजंगी चालू असून यावेळी संजय राऊत यांनी आपले मत मांडले . ते म्हणाले कि , आम्ही असे ऐकले आहे की , जे लोक या विधेयकाला विरोध करतात ते देशद्रोही आहेत किंवा पाकिस्तानी आहेत . जे या विधेयकाचे समर्थन करतात दे देशभक्त आहेत . आम्ही स्पष्ट करतो की , शिवसेनेला कोणी देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही . तसेच देशभरातून या विधेयकास विरोध होत असून यामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे . हे सर्व लोक देशाचे नागरिक आहेत . देशाचे विरोधक नाहीत . त्यामुळे कोणी कोणाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी यावेळी जोरदार कानउघाडणी केली . लोकसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेत यावर चर्चा चालू आहे . विविध राजकीय पक्ष विधेयकाच्या बाजूने आणि विधेयकाच्या विरोधात मत प्रदर्शन करत आहे .

38 views0 comments

Comments


bottom of page