top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी नंदुरबारमध्ये एकास अटक; संशयित ' भाजयुमो ' चा जिल्हाध्यक्ष


नंदुरबार ,(वृतसंस्था) : अयोध्या प्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नंदुरबार भाजयुमो ' च्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे . अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवून कायदा - सुव्यवस्था बिघडली जाऊ नये , यासाठी सतर्क असलेल्या नंदुरबार सायबर सेलने जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशीला काल मध्यरात्री अटक केली .अयोध्या प्रकरणाचा निकाल केव्हाही जाहीर होऊ शकतो . या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचा दृष्टीने जिल्ह्यात पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी व ग्रामीण भागात जनतेमध्ये जागृतीचे काम सुरू होते . जनतेची मानसिकता बदलविण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येत होते . तसेच सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट न करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत होते .

22 views0 comments

Comentarios


bottom of page