वृत्तसंस्था:- ४२ आरोपींना अटक तर ६९ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती मुंबई दि.9: राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.08 मे, 2020 रोजी राज्यात 80 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 69 लाख 58 हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020 पासून दि.08 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 4 हजार 989 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2 हजार 182 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 474 वाहने जप्त करण्यात आली असून रु.13.55 कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्हयांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 3,851 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्हयांची नावे :- 1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापुर, 8. सांगली, 9. सिंधुदुर्ग, 10. रत्नागिरी, 11. नाशिक, 12. धुळे, 13. जळगाव, 14. नंदुरबार 15. गोंदिया, 16. अकोला, 17. वाशिम 18. बुलढाणा 19. अमरावती 20. भंडारा. किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु न केलेल्या जिल्हयांची नावे :- 1. सातारा, 2. औरंगाबाद, 3. जालना, 4. बीड, 5. नांदेड, 6. परभणी, 7. हिंगोली, व 8. नागपूर, किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु झाल्या होत्या परंतु पुन्हा अनुज्ञप्ती बंद करण्यात आल्या :- 1. मुंबई शहर, 2. मुंबई उपनगर, 3. उस्मानाबाद, 4. लातुर व 5. यवतमाळ. 2.मद्यविक्री सुरु असलेल्या अनुज्ञप्तींची संख्या :- (कंसात चालू अनुज्ञप्ती) 1 CL – III (देशीमद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती) 4159 (1502) 2 FL – II ( वाईन शॅाप ) 1685 (438) 3 FL BR – II( बीयर शॉप ) 4947 (1918) एकूण – 10,791 (3858) अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント