इगतपुरी:- (वृत्तसंस्था) तालुक्यात पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी कुरूंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षकाविरूध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एप्रिलअगोदर वारंवार अत्याचार झाल्याचे प्रकरण गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आदेशार्थ पाठविण्यात आले होते . मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी रोहिदास चव्हाण या शिक्षकाविरूध्द गुन्हा दाखल केला . याप्रकरणी पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी तपासी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments