top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

अमळनेर तालुक्यातील कोरोनासंबधी उपाययोजनांचा खासदारांनी घेतला आढावा


वार्ताहर :- शैलेश सोनवणे,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाविषयी माहिती देऊन अमलबजावणीच्या सूचना दिल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर आणि तालुक्यातील क्वारंटाइन, परराज्यातुन आलेल्या मजुरांची व्यवस्था, उज्वला गॅस, लाभार्थ्यांना धान्य वितरण आदी विविध बाबींचा आज बुधवारी आढावा घेत प्रशासनाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाविषयी माहिती देऊन त्याची अमलबजावणीच्या सूचना दिल्या. ही आढावा बैठक प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात संपन्न झाली. या बैठकीत आमदार स्मिताताई वाघ यांचे सॊबत कोरोना आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाविषयी प्रशासनाने केलेली तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी संजय चौधरी, डॉ. प्रकाश ताळे, बाजार समिती सभापती प्रफुल पवार, भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उन्मेष वाल्हे, राकेश पाटील, पंकज चौधरी ,झुलाल अप्पा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अमळनेर शहर आणि तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या, परराज्यातुन आलेल्या आणि चोपडा रस्त्यावर वसतिगृहातमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीं आणि त्यांच्या सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्थेची चौकशी केली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या मोफत अन्नधान्याचे वितरण, उज्वला गॅसचे वाटप यासह पॅकेज मधील सर्वच मदतीचा लाभ सर्वांना विनासायास मिळावा यासाठी संबंधितांना सूचना, मार्गदर्शन केले. अमळनेर तालुका शहर परिसरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यापुढे देखील प्रशासन, स्वयंसेवी संस्था आदींना जी मदत लागेल ती उभी करण्याचा विश्वास दिला .

14 views0 comments

Comments


bottom of page