top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकाला पकडले


पुणे :- (वृत्तसंस्था)अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकाला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने ( कस्टम ) कोंढवा भागात पकडले . त्याच्याकडून २ लाख ८१ हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले . सॅमसन व्हिसेंट मॅक्सवेल ( सध्या रा . साई गुरुप्रसाद अपार्टमेंट , उंड्री , मूळ रा . नायजेरिया ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे . मॅक्सवेलकडे कोकेन असल्याची माहिती कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती . तो उंड्री भागात कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे सापळा लावण्यात आला . त्यानंतर मॅक्सवेलला ताब्यात घेण्यात आले . त्याच्याकडे ३५ .२० ग्रॅम कोकेन आढळून आले असून जप्त केलेल्या कोकेनची किंमत २ लाख ८१ हजार रूपये आहे . कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली . दरम्यान , कस्टमच्या पथकाने मार्च तेजुलै २०१९ या कालावधीत अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एकूण नऊ ठिकाणी कारवाई केली आहे . या कारवाईत एक कोटी ७ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले . गांजा , कोकेन , एस्कटसी , एलएसडी अशा प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत . रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हारो पॉवर लि . या कंपनीच्या दाहिनीत जप्त करण्यात आलेले १ कोटी ७ लाखांचे अमली पदार्थजाळण्यात आले , अशी माहिती सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली .

12 views0 comments

Comments


bottom of page