वृत्तसंस्था:- करोना व्हायरसमुळे 40,000 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागल्यानंतर आता "अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते स्थगित करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार" असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली."अदृश्य शत्रूकडून झालेल्या हल्ल्यामुळे आमच्या ग्रेट अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्यांच्या संरक्षणाची आवश्यकता लक्षात घेता, मी अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते स्थगित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करेन!" असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाचा तपशील अद्याप मिळालेला नाही. तसेच, त्या आदेशावर कधी स्वाक्षरी करणार याबाबतही ट्रम्प यांनी काही माहिती दिलेली नाही.एच १बी व्हिसाद्वारे अमेरिकेत जाणाऱ्या भारतातील आयटी तज्ज्ञांची संख्या मोठी आहे. पण, अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्याची गरज असल्याचा युक्तिवाद ट्रम्प यांनी केला असल्यामुळे भारतातून एच १बी व्हिसाद्वारे अमेरिकेत जाणाऱ्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच उत्तर आणि दक्षिण सीमा बंद केली आहे, जी मोठ्या संख्येने बेकायदेशीर स्थलांतरितांना आकर्षित करते. प्रवासी निर्बंध आणि भारतासह अनेक देशांमधील वाणिज्य दूतावास सेवा बंद करण्याचा परिणाम आधीपासूनच नवीन एच -१ बी व्हिसा देण्यावर होत आहे.करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेत अनेकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर, मागील आठवड्यापर्यंत 22 दशलक्ष अमेरिकी नागरिकांनी बेरोजगारीच्या फायद्यासाठी अर्ज केले आहेत.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント