चाळीसगाव:- शहरातून अपक्ष उमेदवार डॉक्टर विनोद कोतकर यांची रॅली निघाली हातात फुगे घेऊन निघालेली प्रचार करणारी मतदार पाहून शहरात कुतूहल व्यक्त होत होते. तर व्यापाऱ्यांनी योग्य शिक्षित उमेदवार तालुक्याला मिळाला असल्याने तालुक्याचा सर्वांगीण विकास डॉक्टर विनोद यांच्या हातून होईल अशी आशा व्यक्त केली. उखडली रस्ते राज्यमार्ग, महामार्ग ,खिळी खिळी झालेली अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असलेलं कार्पोरेट जगत आणि वाढती बेरोजगारी हा संपूर्ण देशापुढे चिंतेचा विषय आहे,तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. तरुण निकामी देखील झाला म्हणून राज्यात दारुबंदी झाली पाहिजे.चंद्रपूर भांडाऱ्यात बंद होते मग इतर जिल्ह्यात का नको,अनेकांचे संसार उदवस्त करणाऱ्या दारूला बंदी आणता यावी म्हणून विधानसभेत आवाज उठवणार वयोवृद्ध लोक काम करतात मुलं टवाळखोरी करीत फिरतात हे कुठंतरी थांबल पाहिजे शिक्षण नसलेल्या तरुणांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणलं पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यातुन रोजगार निर्मिती झाली पाहिजे यासाठी कुणी प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसत नाही ही खेदाची बाब आहे आणि हेच मूळ प्रश्न सोडवण्यासाठी आपलं बहुमूल्य मत मला द्यावं अस डॉक्टर विनोद कोतकर यांनी सांगितले.त्यांच्याशी व्यापाऱ्यांनी संवाद साधत आपल्या व्यथा आणि समस्यां त्यांच्यसमोर मांडल्या निश्चित त्या सोडवण्याचा आपण सर्व मिळून प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी डॉक्टर कोतकर यांनी त्यांना दिलं.शहरात सर्वदूर फुगे दिसत असल्याने इतर उमेदवारांचा फुगा डॉक्टर विनोद कोटकर फोडणार अशी चर्चा सर्वदूर सुरू आहे."शहरातील जनता हुशार आणि चाणाक्ष आहे अनेक उमेदवार निवडणुकीत आपल नशीब आजमावत आहेत या उच्चशिक्षित आणि डॉक्टर असलेला एकमेव उमेदवार प्रथमच निवडणुकीत उतरला असुन त्यांच्या कडून जनतेच्या अपेक्षा मात्र उंचावल्या आहेत मतदार आता काय निर्णय घेतील हे वेळ ठरवणार असले तरी डॉक्टर विनोद कोतकर मात्र त्यांच्या पेक्षा सरस असल्याचं दिसून येत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
תגובות