top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

अकोला येथील राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव मिल्कसिटी वर बक्षिसांचा वर्षाव


चाळीसगाव : अकोला येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबचे रॅली कॉन कॉन्फरन्स दिनांक 8 ,9 ,व 10 नोव्हेंबर रोजी पार पडले . या राष्ट्रीय अधिवेशनाचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ग्रेट ब्रिटन येथील फिलिस चार्टर व राष्ट्रीय अध्यक्ष कलकत्ता येथील ममता गुप्ता उपस्थित होत्या. अधिवेशन डिस्ट्रिक्ट ३०३ च्या चेअरमन वैजयंतीजी पाठक व अकोला इनरव्हील क्लब यांनी आयोजित केले. या राष्ट्रीय अधिवेशनात चाळीसगाव मिल्कसिटी क्लब च्या 26 सदस्या सहभागी झाल्या होत्या. दि.८ नोव्हेंबर रोजी रॅलीमध्ये क्लबच्या सहा सदस्यांनी पथनाट्य सादर केले. दिनांक 9 रोजी नृत्यस्पर्धा सादरीकरण झाले व चाळीसगाव मिल्क सिटी ने प्रथम क्रमांक नृत्य स्पर्धेत पटकावला. स्पर्धेत योगिता बंग सुनिता जाधव, आरती पूर्णपात्रे ,पूजा लोढा ,दर्षणा शर्मा, शारदा गुप्ता ,राखी छाजेड, रूपाली निकम ,गितांजली देशमुख इत्यादी सहभागी झाल्या होत्या . तसेच इतर विविध स्पर्धांमध्ये क्लबच्या सदस्यांनी विशेष बाजी मारली . यामध्ये एकूण 23 बक्षिसे इनरव्हील मिल्कसिटी चाळीसगांव क्लबने मिळविली .तसेच क्लब आयएसओ सुनिता बोरा यांनी रॅम्प वॉक सादर केले.क्लब मध्ये सर्वात जास्त हजेरी लावणारा क्लब चाळीसगाव मिल्कसिटीचा प्रथम क्रमांक आला.

79 views0 comments

Comments


bottom of page