top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

अकोल्यात करोनाचा पहिला बळी; जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४वर


वृत्तसंस्था :- अकोला जिल्ह्यात करोनामुळे ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सर्वोपचार रुग्णालयात १३ एप्रिलला मृत्यू झालेल्या रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज, बुधवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १४ वर पोहोचली आहे. अकोल्यात करोनाचा पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली असून, प्रशासन व नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला या आजाराने ग्रस्त असलेला एक ४५ वर्षीय रुग्ण सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. खबरदारी म्हणून त्या रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुने करोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आज १५ एप्रिल रोजी सकाळी प्राप्त झालेला त्याचा करोना तपासणी अहवालात पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती शासकीय वैद्याकीय महाविद्याालयाकडून देण्यात आली.जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता १४ झाली आहे. त्यातील करोनामुळे एका रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला, तर एका करोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. उर्वरित १२ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

9 views0 comments

Hozzászólások


bottom of page